मुंबई | सिनेविश्वातील सर्वात प्रभावशाली स्टार्सपैकी एक असलेल्या रजनीकांत यांनी चाहत्यांच्या मनात वेगळीच जागा बनवली आहे. रजनीकांत यांना साऊथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार म्हटलं जातं, एवढंच नाही तर ते भारतीय सिनेविश्वाचे मेगास्टार देखील आहेत. जगभरातील त्यांचे असंख्य चाहते आहेत. आपल्या सिनेमांनी प्रत्येक रेकॉर्ड तोडणाऱ्या रजनीकांत यांचा आज वाढदिवस. १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरूमध्ये जन्मलेले रजनीकांत आता ७१ वर्षांचे आहेत.
‘अपूर्व रागंगल’ सिनेमातून अभिनयाची सुरुवात करणारे रजनीकांत आज करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. एका वृत्तपत्रा च्या रिपोर्टनुसार, रजनीकांत यांची एकूण संपत्ती ३६५ कोटी रुपये आहे. एका वर्षात रजनीकांत आपल्या सिनेमांच्या फीमधून ५०-६० कोटी कमावतात. तसेच रजनीकांत यांना महागड्या आणि आलिशान वाहनांची खूप आवड आहे. त्यांच्याकडे टोयोटा इनोव्हा, रेंज रोव्हर, बेंटली अशा गाड्या आहेत.
साऊथ इंडस्ट्री आणि बॉलिवूड गाजवणारे ‘रजनी’ आज रॉयल आयुष्य जगतात. चेन्नईमध्ये रजनीकांत यांचं भव्य घर आहे जे २००२ मध्ये बांधले गेले. या घराची भव्यता पाहण्यासारखी आहे. देशाच्या अनेक भागात रजनीकांत यांची संपत्ती आहे. एवढंच नाही तर त्यांनी अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे.