मुलांचा सांभाळ नीट करत नाही म्हणून पतीची महिलेला मारहाण

पुणे | राज्यात सध्या महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. त्यातच पुण्यतूल एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. पत्नी मुलांचा सांभाळ नीट करत नसल्याने पतीने तिला मारहाण केली. त्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यात ही घटना घडली आहे. मुलांचा सांभाळ नीट करीत नाहीस, वेळेवर खाऊ घालत नाहीस, या कारणाने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.

या प्रकरणी आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. आसमा तौसिफ हवारी शेख असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तौसिफ हवारी शेख असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी पती तौसिफ आणि मयत पत्नी आसमा हे कशेवाडी तीन मुलासोबत राहण्यास आहेत.त्या दोघांमध्ये सतत वाद होत होते. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता पती तौसिफ याने मयत पत्नी आसमा हिला तू मुलांना नीट सांभाळत नाही असा आरोप तिच्यावर लगावला होता.

तसेच मुलांना जेवण नीट देत नाहीस,त्यांच्याकडे लक्ष दे,म्हणून बेदम मारहाण केली.त्यानंतर सर्व जण झोपी गेले. सकाळी सर्वजण उठले,पण पत्नी आसमा उठत नव्हती. त्यानंतर तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले.तिची तपासणी केली असता,डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे खडक पोलिसांनी सांगितले.

Team Global News Marathi: