कोण आहे जितेंद्र आव्हाड यांचा जावई?, जाणून घेऊया !

 

ठाणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा काल अत्यंत सध्या पद्धतीने पार पडला. आजवर अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्नं लावत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अत्यंत साध्या पद्धतीने मुलीचं लग्न लावलं. जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड हिचा विवाह एलन पटेल याच्याशी झाला. साधेपणाने झालेल्या या विवाहाला काही मोजकी मंडळी उपस्थित होती.

नताशा आव्हाड हिचा विवाह एलन पटेल यांचा विवाह नोंदणी पद्धतीने विशेष मॅरेज अॅक्टनुसार झाला. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. नताशा ही जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी आहे. एलेन पटेल यांच्याशी तिचा विवाह पार पडला. एलेन आणि नताशा इयत्ता पहिलीपासून एकत्र शिकले आहेत.

शाळेतला जोडीदारच तिचा लाईफ पार्टनर झाला आहे. नताशाचं शिक्षण एमएस इन मँनेजमेंटमध्ये झालं आहे. तर एलेनचं शिक्षण एमएस अँड फायनान्स मँनेजमेंटमध्ये झाले आहे. एलेन स्पेनमधल्या एला मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला आहे. मुलीच्या इच्छेनुसार आव्हाड यांनी हे लग्न साधेपणानं केलं असून मतदारसंघातल्या लोकांसाठी लग्नाचं रिसेप्शन ठेवलं जाणार आहे. तर दुसरीकडे मुलीची विदाई करताना जितेद्र आव्हाड काहीसे भावुक झालेले पाह्यला मिळाले होते.

Team Global News Marathi: