आप-आपसात नाही तर भाजपावर सर्जिकल स्ट्राईक करा – कपिल सिब्बल

आप-आपसात नाही तर भाजपावर सर्जिकल स्ट्राईक करा – कपिल सिब्बल

काँग्रेस नेत्यांनी आपल्या पक्षातील सहकार्यावर ऊर्जा खर्च करण्यापेक्षा सर्जिकल स्ट्राईक करून भाजपाच्या अडचणी वाढवाव्यात असा सल्ला काँग्रेसचे जेष्ठ नेते व विधितज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी आपल्या काँग्रेस सहकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस मधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहे.

काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्वात बदल आणि व्यापक सुधारणांची मागणी करणारे पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये
नेते कपिल सिब्बल यांचा समावेश असून ते गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर आक्रमक आणि अप्रत्यक्षपणे टीका करताना सिब्बल दिसून येत आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनियांची बैठक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार गैरहजर

काँग्रेसमध्ये व्यापक बदल करण्याची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करणाऱ्या नेत्यांमध्ये उत्तर प्रदेशचे नेते व माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्हा काँग्रेस समितीने प्रसाद यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर गुरुवारी सिब्बल यांच्या उपरोधिक टीकेची धार आणखी वाढली.

विराट -अनुष्काच्या घरी लवकरच नव्या पाहुण्यांचे आगमन वाचा

ग्लोबल न्युज नेटवर्क: