तर कलेक्टर ऑफिस समोर कोरोना रुग्णाचा मृतदेह घेऊन बसू – खासदार संजयकाका पाटील

तर कलेक्टर ऑफिस समोर कोरोना रुग्णाचा मृतदेह घेऊन बसू – खासदार संजयकाका पाटील

सांगली जिल्हयात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्वभूमीवर प्रशासनाच्या गोंधळ कारभाराविरोधात आता भाजपा खासदार संजयकाका पाटील आक्रमक झाले आहेत. सांगलीत उपचाराविना कोरोना रुग्ण मारत आहेत. प्रशासनच्या या गोंधळ कारभाराविरोधात मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी कार्यलयाच्या समोर उपोषणाला बसण्याचा इशारा खासदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

आज बेड आणि उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक रुग्ण उपचाराविना मृत्यूमुखी पडत आहे तरीही शासन याकडे कानाडोळा करताना दिसते. उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे कोरोना रुग्नांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्यामुळे कोरोनाचा मोठया प्रमाणात संसर्ग होताना दिसून येत आहे. मात्र याकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे असा आरोप पाटील यांनी लगावला आहे

.

खासदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर निशाणा साधला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना आणि मृत्यूचा परिस्थिती हाताबाहेर निघाली आहे, अनेक रुग्णांना उपचाराविना मरावे लागत आहे, त्याचबरोबर सर्वसामान्य रुग्णांची सुद्धा मोठी फरफट सुरू असून कोरोना नसलेल्या रुग्णांना सुद्धा वेळेत उपचार आणि बेड मिळत नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागत आहे आणि ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुंबई-पुणे व बाहेरच्या ठिकाण असणारी अतिरिक्त डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांना पाचारण करण्याची गरज आहे असे बोलून दाखविले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: