सध्या बॉलीवूड मध्ये लगीनघाई सुरु झालेली दिसून येत आहे. अभिनेता वरून धवन याचे काही दिवसांपूर्वी अलिबाग येथे शानदार विविह सोहळा पार पडला होता. आता त्या पाठोपाठ अभिनेत्री दिया मिर्झा सुद्धा दुसऱ्यांना विवाह बंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्येच दियानं साहिल संघासोबतचं ११ वर्षांचं वैवाहिक जीवन संपवत घटस्फोट घेतला होता.
सूत्राच्या माहितीनुसार दिया एका छोट्या समारंभात येत्या १५ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत लग्न करणार आहे. स्पॉटबॉय-ईच्या वृत्तानुसार दिया मिर्झा तिचा बॉयफ्रेंड वैभव रेखीशी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या लग्न सोहळ्याला फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळची मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत.
मागच्या वर्षी दिया तिच्या रिलेशिपमुळे अनेकदा चर्चेत राहिली होती. सूत्रांच्या माहितीनुसार लॉकडाऊनमध्येच वैभव आणि दिया यांच्यात जवळीक वाढली. वैभव मुंबईतील एक बिझनेसम आहे तर वैभवचा त्याची पत्नी म्हणजेच प्रसिद्ध योगा इन्स्ट्रक्टर सुनैना रेखीशी घटस्फोट झालेला आहे. या दोघांना एक मुलगी सुद्धा आहे.