डिसले गुरुजी बनले ‘डॉक्टर’, ‘या’ विद्यापीठाकडून मानद पदवीने सन्मान

 

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांच्या नावाची आता शिक्षणक्षेत्राला सर्वत्र जोरदार चारचा सुरु झाली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींनी जागतिक स्तरावरील पुरस्कार मिळवून जगात महाराष्ट्राचं नाव उंच केलं आहे. त्यामुळे, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून शिक्षणक्षेत्रात त्यांचं योगदान घेण्यात येत आहे.

तसेच त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कामगिरीमुळे त्यांना मानद पद देत अनेक संस्थांकडून त्यांचा गौरवही होत आहे. आता, डिसले गुरुजींना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे, ते आता शिक्षण क्षेत्रातील डॉक्टर बनले आहेत. डिसले गुरुजींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन फोटो शेअर करत मानद डॉक्टरेट मिळाल्याची माहिती दिली.

शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठकडून ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. माझ्यासाठी ही आश्चर्यकारक बाब आहे, या मानद डॉक्टरेट पदवीबद्दल मी आयटीएम विद्यापीठाचे आभार मानतो. तसेच, हा आनंद शब्दात व्यक्त करण्यापलिकडचा आहे, असेही डिसले गुरुजींनी पदवी स्विकारल्यानंतर म्हटले आहे.

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली. जून २०२१ ते जून २०२४ या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या कामातही झेडपीच्या गुरुजींचं योगदान असणार आहे.

Team Global News Marathi: