रत्नागिरीत राणेंच्या पॅनलचा पराभव जिल्हा बँकेवर शिवसेनेच्या सामंतांचा एकहाती विजय

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीय महाविकास आघाडीवर अनेकदा टीका करताना दिसून आले आहे. मात्र सेनेकडून सुद्धा या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देण्यात येते. त्यातच आता पुन्हा एकदा शविसेनेने राणे कुटुंबियांना पराभवाची धूळ चारली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना नेते आणि उच्च तंत्रज्ञान, शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा चांगलाच राजकीय वाचक निर्माण झालेला आहे. यंदाच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरनाम्यान त्यांचा हा वरचष्मा सर्वांनाच दिसून आलेला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यातच सरळ सरळ लढत होती.

रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी रत्नागिरी जिल्हा बँक अखेरीस शिवसेना पक्षाच्या ताब्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने निवडणूक लढविली होती. त्यांना निलेश राणे यांच्या पॅनलचं कडवं आव्हान होतं.

जिल्हा बँकेत २१ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार होती. याआधीच १४ जागा या बिनविरोध झाल्या होत्या. ७ जागांसाठी निवडणूक होणार होती.७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ५ जागा सामंत यांच्या सहकार पॅनलने राखल्या तर विरोधी पॅनलचे अजित यशवंतराव दुग्ध मतदार संघातून आणि लांजा तालुका मतदारसंघातून भाजपा अध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर हे प्रथमच संचालक पदी निवडून आले आहेत.

Team Global News Marathi: