दिशा सालियनच्या आईवडिलांचे राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ही मागणी

 

‘केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे हे दोघे आपली मुलगी दिशा हिच्या मृत्यू प्रकरणाचे राजकारण करून आमच्या कुटुंबाची जाहीर बदनामी करत आहेत. त्यांच्यामुळे आमचे जगणे कठीण झाले आहे. राणे पितापुत्रावर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आत्महत्या करावी लागेल’ असे पत्र दिशा सालियन हिच्या आईवडिलांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन आणि आई वासंती यांनी राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. ‘नारायण राणे आणि नीतेश राणे हे आपल्या मुलीच्या आत्महत्येचा संबंध सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येशी जोडून सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवरून खोटय़ा बातम्या पसरवत आहेत.

राणे कुटुंबीय राजकीय स्वार्थापोटी आमच्या मुलीच्या मृत्यूचे भांडवल करून आमचे आयुष्य दुःखी करून टाकले आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, संबंधित अधिकाऱयांना योग्य ती पावले उचलण्याची सूचना द्यावी.’ असे दिशाच्या आईवडिलांनी राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. यावर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: