तुम्ही गुलाम किंवा प्रचारक म्हणून स्वतःला जुंपून घेऊ शकत नाही’

 

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर पुन्हा एकदा निशाणा साधला गेला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग करण्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या अप्रत्यक्षपणे समाचार घेत त्यांना फटकारलं. यावरुनही सामनाच्या अग्रलेखात थेट न्यायवस्थेवरच प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून चोर बाजारातला आहे हे उघड झालं, असं यात म्हटलं गेलं आहे.

न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम.एम.सुंदरेश यांच्या खंडपीठाने, “प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची आम्हाला चिंता वाटत नाही. परवा महाराष्ट्र सरकारमधील एका व्यक्तीने असं वक्तव्य केलं की आता त्यांना न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. आम्ही हे वाचलं, पण या गोष्टींमुळे आम्हाला काही फरक पडत नाही. अशा वक्तव्यांची जागा आमच्यासाठी केराची टोपली आहे”, असे म्हणत संजय राऊतांना फटकारलं.

अग्रलेखात म्हंटल आहे की, केंद्र सरकारच्या हाती असलेला न्यायाचा तराजू हा चोर बाजारातून विकत आणला आहे.न्यायाचा तराजू हलतोय आणि सत्याची गळचेपी सुरू आहे. अशा वेळेला न्यायालयांनी जनतेचा आवाज बनायला हवं. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी न्यायालयांनाच पुढे यावं लागेल. मात्र आज हे सगळेच लोक बडे किंवा छोटे गुलाम बनून अंधभक्तीचा सूर आवळीत आहेत. परमबीर सिंग प्रकरणांचा तपास राज्याकडून सीबीआयकडे गेला हा ठाकरे सरकारला धक्का वगैरे असल्याचा ‘नाच’ विरोधक करीत आहेत. ते सर्वस्वी चूक आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकाराच्या अधिकारांवरील आक्रमण समोर आलं, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

Team Global News Marathi: