दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

 

भाजप आमदार नितेश राणे यांनी सुशांत सिह यांची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात खुलास्यांचा सपाटा लावत खळबळ उडवून दिली होती. दिशाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर नितेश राणेंना पोलिस चौकशीला देखील सामोरं जावं लागलं होते.त्यानंतरही नितेश राणेंनी दिशा सालियन प्रकरणात नवा दावा केला आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे युवासेना पदाधिकारी राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाने छापा टाकला. आयकर विभागाच्या कारवाईमुळे चर्चेत आलेले कनाल यांचा दिशा सालियन प्रकरणात संबंध असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

8 जून आणि 13 जूनच्या रात्री कनालचं मोबाईल लोकेशन आणि सीडीआर तपासला पाहिजे. यातून दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण सोडवण्यात मदत होईल, असा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी ट्विट करत केला आहे. तसेच राहुल कनाल यांचा दिशा सालियन व सुशांत सिंहच्या राजपूतच्या मृत्यूशी संबंध असल्याचा संशय नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. दिशा सालियन प्रकरणात राहुल कनालचा काही संबंध आहे का? याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा राणे यांनी केली आहे.

 

Team Global News Marathi: