इंदूरीकर महाराजांनी त्या युट्युबर ना दिला शाप;म्हणाले ‘त्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील…’

अकोला : वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कीर्तनाच्या व्हिडीओ क्लीप तयार करुन यूट्यूबवर (YouTube) अपलोड करणाऱ्या तरुणांवर इंदुरीकरांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

“माझ्या जीवावर 4 हजार जणांनी यूट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमवले आहेत, आणि याच लोकांनी मला अडचणीत आणलं. यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही, क्लिपा टाकणाऱ्यांचं असं पोरगं जन्माला येईल” असं म्हणत दिव्यांग शब्दाकडे निर्देश करणारे हातवारे इंदुरीकरांनी केले. सोमवारी रात्री अकोला शहरातील कौलखेड भागात त्यांचं कीर्तन झालं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित केलं होतं.

 

आपल्या किर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स युट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. त्यांचं वाटोळं होईल, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी करुन नवा वाद निर्माण केला आहे. अकोला शहरातील कौलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं किर्तन आयोजित केलं होतं. आपल्या जीवावर आतापर्यंत 4 हजारांवर लोकांनी युट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमवले आणि याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणलं, अशी तक्रार इंदूरीकर महाराजांनी आपल्या किर्तनातून व्यक्त केली.

 

इंदुरीकर नेमकं काय म्हणाले?

चार हजार यूट्यूबवाले कोट्यधीश झाले माझ्या नावावर, नालायकांना पैसे मोजता येईना, आणि माझ्यावरच चढले, माझ्यावर पैसे कमावले, क्लिपा माझ्यावर तयार केल्या, यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही, क्लिपा टाकणाऱ्यांचं असं पोरगं जन्माला येईल.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: