दिशा पाठोपाठ आदित्य ठाकरेंवर भाळली ‘ही’ अभिनेत्री, पोस्ट सर्वत्र चर्चेत

 

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलचं तापल आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा आणि महाविकास आघाडीचं कोसळलेलं सरकार… अशा अनेक गोष्टींमुळे राज्यात राजकीय हालचालींनी जोर धरला आहे. 2019 मध्ये अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर पर्यटन व पर्यावरण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन आदित्य सोशल माडियाच्या माध्यामातून लोकांना माहिती देत असतात.

सध्या आदित्य यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल होण्यामागे कारण देखील तसंच आहे. आदित्य ठाकरे यांच्या पोस्टवर एका अभिनेत्री कमेंट केली आहे. ही अभिनेत्री दिशा पटानीनसून दुसरीचं आहे. आदित्य ठाकरे यांनी वडील उद्धव ठाकरे यांचा एक फोटो स्वतःच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये, ‘नेहमी योग्य व्यक्तीचा आदर्श घेण फार महत्त्वाचं असत. तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांसाठी सर्वांचा ऋणी आहे. तुमचं प्रेम हीच आमची खरी ताकद आहे.’असं लिहिलं आहे.

आदित्य ठाकरेंच्या या पोस्टवर अनेक जण कमेंट आणि लाईक करत आहेत. पण एका अभिनेत्रीने केलेली कमेंट सर्वांचं लक्ष वेधत आहे. अभिनेत्रीने आदित्य यांच्या पोस्टवर 5 हार्ट इमोजी कमेंटमध्ये लिहिल्या आहेत. तेव्हा ही अभिनेत्री दिशा पटानी असेल, असा अंदाज अनेकांनी बांधला असेल. पण ही अभिनेत्री दिशा पटानी नसून अभिनेत्री अहाना कुमरा आहे. आहना कुमरा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे.

Team Global News Marathi: