“बेइमानांच्या मुलांना कोणी बायको देणार नाही” म्हणणारे आमदार बांगर शिंदे गटात सामील

 

विधानसभेचे अध्यक्ष पद काबीज करत शिंदे गट आणि भाजपने पहिला डाव जिंकला असून आज शिंदे सरकार आज विश्वासदर्शक ठराव मांडणार असून त्या निमित्ताने सत्तापक्ष व विरोधक यांच्यातील दुसरा सामना बघायला मिळेल. या निवडणुकीत भाजपचे दोन आमदार अनुपस्थित असताना १६४ मते घेत भाजपचे राहुल नार्वेकर जिंकले. आता नवे सरकार विश्वासमतही जिंकेल अशी स्थिती आहे.

मात्र बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. इतके दिवस उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे संतोष बांगर हेदेखील आता शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर शिंदे गटातील आमदारांची संख्या ४० वर पोहोचली आहे. हिंगोली मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आता शिंदे गटात सामील झाले आहे.

संतोष बांगर अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या बाजूनं होतं. त्यांनी काल शिंदे गटाच्या विरोधात मतदान केलं होतं. पण आज सकाळी ते ट्रायडंट हॉटेलमधून शिंदे गटाच्या बसमध्ये उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे. ज्या पक्षाने आमदार केले, त्या पक्षाला सोडून जाता, बेइमानी करता, अशा बेइमान लोकांचे काही भले होणार नाही. त्यांच्या बायका यांना सोडून जातील, या बेइमानांच्या मुलांना कोणी बायको देणार नाही. ते मुंजेच राहतील, अशा शब्दांत आमदार संतोष बांगर यांनी वसमत येथे भावना व्यक्त केल्या.

Team Global News Marathi: