शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेयांच्या खात्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली.MMRDA ने तयार केलेली घर माझ्या लोकांना मिळाली नाहीत’असं म्हणत लांडेंनी सरकारला घरचा अहेर दिला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात नगर विकास विभागाच्या कामकाजावर चर्चा पार पडली. या चर्चेच्यावेळी एकच गोंधळ झाला. शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी आपल्याचे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या विभागाबद्दल जाहीरपणे नाराजीच बोलून दाखवली.
‘हे माझं सभागृहातील कदाचित शेवटचं भाषण असेल. पण MMRDA ने तयार केलेली घर माझ्या लोकांना मिळाली नाहीत. ती लोक अजूनही वंचित आहे. ते वाहून जातील, त्याआधी मी स्वतः वाहून जाईन. माझा ‘विधी’ करण्यासाठी सरकारने तरतूद करावी, अशी मागणीच लांडे यांनी केली. लांडे यांनी अशी मागणी करत पक्षाला घरचा अहेर दिला त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
लांडे यांच्या नाराजीनंतर तातडीने एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. ‘मी दिलीप लांडे यांच्याबाबत काही होऊ देणार नाही, नगरविकास मंत्री म्हणून मी सक्षम आहे. त्यांच्या संपूर्ण अडचणी मी दूर करणार’ अशी हमीच शिंदेंनी दिली. आमदारांना मिळणार 5 कोटींचा विकास निधी दरम्यान, कोरोना काळापासून आमदारांच्या निधीवरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी उघडपणे निधीवरून नाराजी व्यक्त केली होती.