” दिलीप वळसे पाटील निर्णय घेण्यासाठी सक्षम”

 

मुंबई | अमरावती येथे असलेल्या दंगलीवर संजय राऊत यांच्या टिकेनानतंर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट महाविकास आघाडीवर आरोप लगावले होते आता या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे ते आज माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. हे ठाकरे सरकार आहे, इथं कायदेशीर कारवाई करताना गट तट पक्ष पाहिला जात नाही, असं प्रत्युत्तर राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं.

तसेच पुढे बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात अमरावतीसारख्या घटना घडू नये म्हणून त्यांनी आगीत तेल न टाकता अशा घटना थांबाव्यात म्हणून काम करायला हवं. महाराष्ट्र हा दंगलीसाठी ओळखला जाऊ नये. हे कायद्याचं राज्य आहे असे प्रतिउत्तर अमरावती घटनेच्या मुद्द्यावरून राजकारणात करणाऱ्या भाजपा नेत्यांना दिले होते.

विदर्भात पुढे २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. कायदा सर्वांना समान आहे. अमरावतीत काय घडलं ते कुणी केलं ते देशाला माहिती आहे. गृहमंत्र्यांना आणि अमरावतीच्या जनतेला माहिती आहे. वातावरण शांत झालं असताना उगाचच कुणी काड्या करण्याचं काम करु नये, असं संजय राऊत म्हणाले. आता राऊत यांच्या या टीकेला भाजपा काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: