डिजिटल प्लॅटफॉर्मचा मनसेकडून पुरेपूर वापर,  राज ठाकरेंच्या विचारांना follow करण्याचं आवाहन

 

 

मुंबई | आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरु केली असून मागच्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाही आणि पुणे येथे होणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे वाढलेले दिसून येत होते.  आता त्या पाठोपाठ डिजिटल प्लॅटफॉर्मवरून मनसेला घराघरात पोहचवण्यासाठी मनसेने कंबर कसली आहे.

 

काय आहे मनसेचा डिजिटल राजमार्ग?

 

प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नवनिर्माणाच्या विचारांना follow करत, राज्यभरातील महाराष्ट्र सैनिकांच्या कार्याला like करत, महाराष्ट्र धर्म share करत, अन्यायाविरोधात comment करत मनसेचे वादळ उठवू या! निवडणुकीतील विजयाकडे नेणारा डिजिटल राजमार्ग बांधूया! असे म्हणत मनसेने एक पोस्ट शेअर केली आहे.

 

तसेच मनसे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत प्रसार माध्यम MNS Adhikrut हे आता कात टाकत असल्याचे म्हटले आहे. तसेच फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांच्यासह विविध समाज माध्यमांवर उपस्थित महाराष्ट्र सैनिकांना आणि जगभरातील मराठीजणांना जोडून घेत नव्या रंगात, नव्या ढंगात येत आहे. आपल्याला राज ठाकरे यांनी मांडलेला नवनिर्माणाचा विचार अधिक प्रभावीपणे सर्वदूर पोहोचवायचा आहे. त्यासाठी तुमचाही सहभाग हवाच असे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Team Global News Marathi: