धोनीचा नाद खुळा फॅन… बाळाच्या सातव्या महिन्याच्या वाढदिवसाचे भन्नाट सेलिब्रेशन, फोटो व्हायरल

धोनीचा नाद खुळा फॅन… बाळाच्या सातव्या महिन्याच्या वाढदिवसाचे भन्नाट सेलिब्रेशन, फोटो व्हायरल

IPL 2021 2nd Half : आयपीएल 2021च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आजपासून होत आहे.

आयपीएलच्या दुसरा टप्प्यातील पहिला सामना आज धोनीची चेन्नई आणि रोहितच्या मुंबईदरम्यान होत आहेत.

आयपीएलमध्ये असलेल्या प्रत्येक संघाचे आणि खेळाडूंचे अनेक चाहते देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत.

आपल्या आवडत्या खेळाडूविषयी किंवा संघांविषयी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी चाहते अनेक भन्नाट कल्पना शोधून काढत असतात.

यामध्ये  भारतीय संघाचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे चाहते आघाडीवर असतात.

यात आता अजून एका नव्या चाहत्याची भर पडली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील धोनीचे चाहते इंजिनिअर सागर प्रदीप  तातेड यांनी त्यांचा मुलगा सारांश सात महिन्याचा झाल्यानंतर  त्याच्या वाढदिवसाचे अनोखं सेलिब्रेशन केलं आहे.

क्रिकेटची आवड आणि MS धोनीचा नंबर सात अशी थीम घेऊन अनोख फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड  व्हायरल झालं आहे.


मुळात आमच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना क्रिकेट ची आवड आहे. तर माझा मुलगा सागर हा देखील धोनीचा फॅन आहे. त्यामुळे नातवाचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा केला आहे असे प्रदीप तातेड यांनी सांगितले..

प्रदीप तातेड 9822556166

ग्लोबल न्युज नेटवर्क: