धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिवसेना अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ‘या’ चिन्हाची मागणी करणार

 

शिवसेनेत शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये मोठी उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गटाने दावा केल्याने याची सुनावणी निवडणूक आयोगासमोर होणार आहे. तर निवडणूक आयोगानं त्वरीत सुनावणी घेण्यास उद्धव ठाकरेंनी विरोध दर्शवलाय. ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडे लेखी पत्र सादर केलंय. एकनाथ शिंदेंनी त्वरीत सुनावणी घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं शिंदेंच्या पत्राची दखल घेऊन ठाकरेंना पत्र पाठवलं.

पण, ठाकरे त्वरीत सुनावणी घेण्यास तयार नाहीत. जोपर्यंत सर्व कागदपत्रे सादर होत नाही तो पर्यंत सुनावणी घेऊ नये, कागदपत्रांसाठी अजून 4 आठवडे लागणार असल्याची विनंती उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला करणार आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटानं निवडणूक आयोगापुढं सादर केलेली प्रतिज्ञापत्र बनावट असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटानं केलाय.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही ठाकरे गटानं जोरदार आक्षेप घेतला. संबंधित कागदपत्रं दाखल केली असताना, आज दुपारपर्यंत म्हणणं मांडण्याचं पत्र कसं पाठवलं, अशा शब्दांत ठाकरे गटानं निवडणूक आयोगालाच जाब विचारलाय. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 4 आठवड्यांचा वेळ द्यावा, अशी मागणीही ठाकरे गटानं केली आहे.

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने पूर्वतयारी सुरु केली आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास दुसऱ्या चिन्हाची मागणी करणार आहे. शिवसेनेकडून निवडणूक आयोगांकडे वाघच्या चेहरा म्हणुन निशाणी मिळू शकते का अशी मागणी कारण्यात आलीय. जर धनुष्यबाणं हे चिन्ह गोठवलं तर तोंडावर आलेल्या पोटनिवडणीकीसाठी कोणते चिन्ह वापरायचे हा मोठा प्रश्न शिवसेने समोर आहे.

Team Global News Marathi: