Big Breaking:उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का; शिवसेना नाव अन धनुष्यबाण चिन्ह गोठवलं

Big Breaking:उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का; शिवसेना नाव अन धनुष्यबाण चिन्ह गोठवलं

नवी दिल्ली- शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता धनुष्यबाण चिन्ह वापरू शकणार नाही. मात्र शिंदे गटासाठी ही जमेची बाब ठरू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Symbol of Shiv Sena Bow and Arrow has been fridged for election)

ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. तसेच संपूर्ण पक्ष माझ्यासोबत असल्याचं म्हणत शिवसेना पक्षावर आपला हक्क सादर केला होता. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्ष चिन्हाचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेला होता. मात्र आज निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय़ घेतला आहे. शिवाय शिवसेना नाव दोन्हीही गटाला वापरता येणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं असून ते रद्द केलेलं नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील निर्णय ठाकरे गटाच्या बाजुने गेल्यास धनुष्यबाण चिन्ह पुन्हा एकदा ठाकरे गटाला मिळू शकेल. मात्र या जर तरच्या बाबी आहे.

अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह धनुष-बाणावर दावा सांगितला होता. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता निवडणूक चिन्हाचा हा वाद लवकर निकाली काढणे आवश्यक आहे. कारण उद्धव ठाकरे गट आपल्या उमेदवारांसाठी धनुष्य-बाण चिन्हावर दावा करू शकते, असंही पत्रात नमूद केलं होतं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: