धक्कादायक | सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं

 

सांगलीत एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या केली असून या घटनेमुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक संकटाना कंटाळून या नऊ जणांनी आत्महत्या केली आहे. सांगलीतल्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास केला जात आहे मात्र या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे.

संपूर्ण सांगली या घटनेने हादरली आहे. विष पिऊन कुटुंबातील 9 सदस्यांनी आतम्हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या कुटुंब हे एका पशुवैद्यकीय डॉक्टरचं होतं. या डॉक्टरशी बराचवेळ फोनवरुन संपर्क केला जात होता. मात्र संपर्क होऊ न शकल्यानं संशय व्यक्त करण्यात आला. तसंच सकाळी उशिरापर्यंत घराचा दरवाजाही उघडण्यात आलेला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल फोनवरुन सातत्यानं संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. मात्र कुणीच फोन उचलला नाही.

अखेर ग्रामस्थांनी घरात जाऊन पाहणी केल्यानंतर धक्कादायक चित्र समोर दिसलं. डॉक्टरांच्या कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. तर त्यांच्या भावाच्या घरातील तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं. विष घेऊन या सगळ्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मिरज ग्रामीण पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा आता कसून तपास केला जातो.

 

Team Global News Marathi: