देवेंद्र फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रतिक्रिया !

 

मुंबई | ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये आरोपाच्या चांगलाच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. यामध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर आरोप देखील केले आहेत. तसेच राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील यांच्यावर देखील आरोप केले आहेत.

सरकारकडून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखलं जात आहे. असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्ब नंतर आघाडीमधील नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्ब वर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अजून मी व्हिडीओ पाहिले नाहीत. उद्या मी यावर उत्तर देईन.

व्हिडीओची सत्यता पडतळावी लागेल. जे आरोप झालेत त्यावर उद्या सविस्तर बोलेन अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पेनड्राईव्ह दिला केला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विधानसभा अध्यक्षांकडे पेनड्राईव्ह देत म्हणाले आपल्याकडे सव्वाशे तासाचे व्हिडीओ फुटेज आहे. यामध्ये राज्य सरकार विरोधी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Team Global News Marathi: