“देवेंद्र फडणवीस दबंग नेते, शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात”

 

पुणे | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीबरोबरच राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावरून परिषदेत खबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची आता राजभरात चर्चा सुरु झाली आहे.

‘देवेंद्र फडणवीस दबंद नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क असं ते म्हणाले आहेत. आता फडणवीस यांची थेट स्तुती करताना केलेल्या विधानामुळे राज्यात वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

”येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई झाली. त्यातून वेगवेगळी माहिती देत ते मार्ग बदलू लागले आहेत. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, राष्ट्रवादीकडे गृह खातं देऊ नका असे विधान सुद्धा त्यांनी केले होते.

Team Global News Marathi: