देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या खेळाचे मास्टरमाइंड |

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी पुन्हा पत्रकार परिषद घेत मोठा खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत नवाब मलिकांनी जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरुन ड्रग्जचा खेळ सुरू आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच, जयदीप राणांचा फडणवीसांसोबत संबंध काय?, असाही सवाल केला आहे.

मलिक म्हणाले की, ‘जयदीप राणा यांचा फोटो मी ट्विटरवर शेअर केला आहे. एका मराठी वेब पोर्टलनं दिलेल्या बातमीत त्यात वर्मा नावाच्या व्यक्तीने ही माहिती दिली आहे. मी फोटो ट्वीट केलेला व्यक्ती जयदीप राणा आहे. तो सध्या साबरमती जेलमध्ये आहे. राणाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संबंध आहेत. यावेळी त्यांनी अमृता फडणवीसांच्या एका व्हिडिओचा संदर्भ दिला होता.

मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या पत्नीने अमृता यांनी एक गाणं गायलं होतं. नदी संरक्षण अभियानासाठी ‘रिव्हर साँग’ बनललं होतं. त्यात सोनु निगम व अमृता यांनी गाणं गायलं होतं. तर, त्यात देवेंद्र फडणवीस अभिनय केला होता. या गाण्याला जयदीप राणा यांनी अर्थसहाय्य पुरवलं होतं. राणा हे ड्रग्ज पेडलर आहेत. देवेंद्र फडणवीस व जयदीप राणा यांचे घनिष्ठ संबंध आहेत आता मलिक यांनी लागलेल्या आरोपांवर भाजपा काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: