नवाब मलिक यांच्या आरोपणानंतर अमृता फडणीवसांचे ट्विट

 

मुंबई | मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणापासून नवाब मलिकांनी सुरू केलेलं समीर वानखेडेंवरच्या आरोपांचं सत्र आता वेगळंच वळण घेताना दिसत आहे. ड्रग्ज प्रकरणात भाजपाचाही सहभाग असून ता सर्व प्रकणात देवेंद्र फडणवीस राज्यातल्या ड्रग्ज प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपांवर अमृता फंणवीस यांनी ट्विट करून सडेतो प्रतिउत्तर दिले आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की’ चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा ? कारण *विनाशकाले विपरीत बुद्धी* असते ! असे एका वाक्यात ट्विट करून त्यांनी मलिक यांनी लागलेल्या आरोपावरून त्यांनाच टोला लगावला आहे. आज सकाळी पत्रक परिषेद घेऊन नवाब मलिक यांनी थेट भारतीय जनता पक्षावर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष केले होते. यावरूनच अमृता फडणवीस यांनी एका वाक्यात टीकेला प्रतिउत्तर दिले आहे.

तसेच दर्रेकर यांनी सुद्धा मलिक यांच्यावर घणाघाती टीका केली आहे ते म्हणाले की, “मला वाटतं नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. कारण रोज सकाळी उठल्यावर कुठलातरी फोटो शोधायचा, त्या आधारे ट्विट करायचं आणि सनसनाटी पैदा करण्याचा प्रयत्न करायचा अशी त्यांची गेल्या काही दिवसातली कामगिरी दिसतेय. मला असं वाटतं, मंत्री म्हणून शपथ घेताना गुप्ततेच्या ज्या अटी संविधानाने घातलेल्या आहेत, त्याचाही भंग होताना दिसतोय.

Team Global News Marathi: