“देवेंद्र फडणवीस झोपेतही बडबडतात अन् बेडवरून खाली पडतात”

 

नागपूर | शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरूवात झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत सोमवारपासून नागपुरात होते. तीन दिवस बैठकींचा सपाटा लावल्यानंतर संजय राऊत गुरूवारी मुंबईत परतले. मुंबईला परतण्यापूर्वी राऊतांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली.

संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना भाजप नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला. फडणवीस झोपेतही बडबडतात अन् बेडवरून पडतात, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. तर भाजपपासून दूर झाल्यामुळे आम्हाला संघटनात्मक त्रुटी जाणवायला लागल्या असल्याचंही राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस झोपेतही बडबडतात की, सरकार पडणार..पडणार.. अन् बेडवरून खाली पडतात, अशी भाजपची अवस्था आहे. त्यांना स्वप्नरंजनातून बाहेर पडायला हवं, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. तर आमचे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार, असा विश्वास देखील राऊतांनी व्यक्त केला आहे.

Team Global News Marathi: