देवेंद्र फडणवीस आज घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

 

मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट होणार आहे. दुपारी फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याची बातमी आहे. अलीकडेच विधानसभा सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनी त्यांना लिहिलेल्या पत्राचं कौतुक करत त्यांचे फोन करून आभार मानल्याचं सांगितले होते. त्याचसोबत लवकरच मी त्यांना भेटायला जाणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितले.

त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस हे दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत फूट पडली आहे. शिवसेनेचे तब्बल ४० आमदार शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेत घडणाऱ्या या घडामोडीत मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

आज रंगशारदा सभागृहात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार होते. मात्र मंगळवारी राज ठाकरेंनी पत्रक काढून पावसामुळे हा मेळावा पुढे ढकलत असल्याचं सांगितले. त्यामुळे मनसेचा आजचा मेळावा रद्द झाला. त्यात आज देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होत आहे. त्यामुळे विविध तर्कवितर्क लढवले जात आहे तसेच या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Team Global News Marathi: