‘चला हवा येऊ द्या’मध्ये अशोक (मामा) सराफ यांचा अपमान

 

‘चला हवा येऊ द्या’ या रिअॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबतच अनेक चित्रपटांचं प्रमोशनदेखील केलं जातं. त्यामुळे हा कार्यक्रम विविध कारणांसाठी चर्चेत असतो. कायम प्रेक्षकांची दाद मिळवणाऱ्या या कार्यक्रमावर सध्या नेटकरी नाराज असून त्यांनी निलेश साबळेसह या शोच्या सगळ्या टीमला ट्रोल केलं आहे. अलिकडेच या कार्यक्रमाच्या मंचावर ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. मात्र, या कार्यक्रमात त्यांना अपमानस्पद वागणूक दिल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

अशोक सराफ यांचा काही दिवसांपूर्वीच ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मराठी कलाविश्वात मोठ्या दणक्यात हा दिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे आशोक मामांचा सत्कार करण्यासाठी त्यांना चला हवा येऊ द्याच्या मंचावर बोलावण्यात आलं. मात्र, येथे मामा येताच त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली.इतकंच नाही तर अशोक सराफसारखे दिग्गज कलाकार समोर असतानाही स्वप्नील जोशी त्याच्या खुर्चीवरुन उठला नाही. त्यामुळे त्यालाही नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं.

अशोक सराफ ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आल्यानंतर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. मात्र, स्वप्नील जोशी त्याच्या खुर्चीवरुन साधा उठलाही नाही. हेच या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आला असता स्वप्नील ताडकन त्याच्या खुर्चीवरुन उठला आणि त्याचं स्वागत केलं. इतकंच नाही तर संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत तो स्टेजवर अनिल कपूरच्याच बाजूला बसला होता. तर, अशोक मामा आले असता स्वप्नील एकदाही त्याच्या खुर्चीवरुन उठला नाही. ही गोष्ट नेटकऱ्यांना प्रचंड खटकली आणि त्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Team Global News Marathi: