“देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी”

 

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. यासोबतच अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि दापोलीत एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीनंतर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक मोठं विधान केलं आहे. अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. या रिसॉर्ट प्रकरणात किरीट सोमय्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती.

त्यानंतर आता ईडीने केलेल्या धाडसत्रानंतर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत मोठं विधान केलं आहे. किरीट सोमय्या यांनी म्हटलं, “अनिल परबवर ईडीची कारवाई सुरू… अनिल देशमुख, नवाब मलिक त्याच्यानंतर आता अनिल परब यांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी”. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री अनिल परब हे वांद्रे येथील घरी नसल्याची माहिती मिळत आहे.

ED चे अधिकारी आले तेव्हा अनिल परब घरी नव्हते. वांद्रे येथील अनिल परब यांच्या घरी ED च्या अधिकाऱ्यांसोबत CRPF चे सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत. अनिल परबांच्या संबंधित सात मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाडसत्र सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगामी महानगरपालिकेपूर्वी झालेल्या या कारवाईमुळे शिवसेनेला एक मोठा झटका असल्याचं बोललं जात असून यावर आता शिवसेना नेते काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: