छत्रपती संभाजीराजे भाजपवर ऐवढे नाराज का आहेत?;

 

मुंबई | कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना अगोदर शिवसेना प्रवेश तरच राज्यसभेची संधी अशी ऑफर देण्यात आली होती, मात्र संभाजीराजेंनी ही ऑफर नाकारली आहे. आता राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावरूनच भाजप तसेच संभाजी राजेंच्या समर्थकांकडून टीका केली जात आहे. आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.

दिली सय्यद यांनी ट्विट केले आहे की, “छत्रपती संभाजीराजे भाजपवर ऐवढे नाराज का आहेत? भाजपतुन बाहेर जाण्याचा निर्णय त्यांनी का घेतला? भाजप त्यांना थांबवून दुसरी जागा का देत नाही? फक्त निवडणुकी पुरते भाजपला छत्रपती हवे होते का? याचे स्पष्टीकरण भाजपला द्यावेच लागणार!”, असे ट्वीट त्यांनी केले असून यावरून आता थेट भाजपाला डिवचण्याचा काम दिली सय्यद हिने केले आहे.

दरम्यान मी कोणत्याच पक्षाच्या बंधनात अडकणार नसल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. तर छत्रपतींचा, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा आम्ही संभाजीराजेंना द्यायला तयार झालो. यापेक्षा शिवसेना अजून काय करू शकते हे सांगावं. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र दुसरीकडे संभाजी राजे काय निर्णय घेतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: