‘देशात हिटलरशाही सुरू’, जे पी नड्डांच्या विधानावरून उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

 

मुंबई भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एक भाषण केले आहे. भाजपविरोधात लढण्यासाठी कोणत्याच पक्ष उरलेला नाही. जे संपले नाही ते पक्ष संपतील आणि आता फक्त आपण टिकणार आहे. त्यांचं वक्तव्य हे देशाला हुकुमशाहीकडे नेणारं आहे. देशात सध्या हिटलशाही सुरू आहे’ अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज राऊत कुटुंबीयांची भेट घेतली.

या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एक भाषण केले आहे. सर्व लोकांनी आता कान आणि डोळे उघडून त्यांना आता मदत करायची की नाही, हे सर्वसामान्य लोकांनी ठरवायची आहे. 20-30 वर्ष काम करून लोक भाजपमध्ये येतात. भाजपविरोधात लढण्यासाठी कोणत्याच पक्ष उरलेला नाही. जे संपले नाही ते पक्ष संपतील आणि आता फक्त आपण टिकणार आहे.
त्यांचं वक्तव्य हे देशाला हुकुमशाहीकडे नेणारं आहे. राष्ट्रवादी भाऊ बहिणीचा, शिवसेना कुटुंबाचा पक्ष आहे, भाजपला वंशवादाविरोधात लढायचे आहे. मग भाजपचे वंश कोणता आहे. त्यांच्याकडे इतर पक्षातून लोकं आली आहे.

त्यांचे हे घृणास्पद राजकारण आहे. त्यांच्यासोबत येतील ते आपले, नुसते सोबत येतील तर जे येतील ते आपले गुलाम आहे. गुलामगिरीकडे वाटचाल करणारी ठरले आहे, अशी टीका ठाकरेंनी केली. ‘नड्डा ज्या पद्धतीने पक्ष वाढवत आहे, राजकारणात बुद्धीबळाचा वापर करावा लागतो. पण नड्डा ज्या प्रकारे पक्ष वाढवत आहे, त्यात नुसते बळ वापरत आहे, बुद्धीचा वापर करत नाही.

आज तुमच्याकडे आहे, आज तुम्ही सर्वांना संपवण्याचा विचार करत असाल तर सर्वांचे दिवस हे सारखे नसतात. दिवस फिरल्यावर तुमचं काय होणार याचा विचार केला पाहिजे, असा इशाराही ठाकरेंनी दिला. ‘संजय राऊत हा माझा चांगला सहकारी आणि मित्र आहे.

तो निर्भिड आहे, जे त्याला वाटते ते तो बोलतो. ज्या पद्धतीने त्याला अटक केली, मरण आले तरी चालेल पण शरण येणार नाही. जे तिकडे शरण गेले आहे, हमाममध्ये गेले आहे, एकदा सत्तेचा फेस उतरला की सगळं समोर येईल’ असा सल्लाही ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिला. ‘बाळासाहेबांनी मला एक सांगितलं, जेव्हा दुसरे महायुद्ध पेटले होते, हिटलर जिंकणार अशी शक्यता होती.

डेव्हिड लो एक व्यंगचित्र काढायचे, त्यावेळी तो नामहोर व्हायचा, त्यामुळे हिटलरने त्याला घेऊन येण्याचे सांगितले होते. आता देशात तसंच सुरू आहे. बळजबरीने त्याला घेऊन यायचे.. देशात सध्या हिटलरशाहीचे राजकारण सुरू आहे’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

चार घरांची चव चाखून आलेले शिवसेनेला शहाणपणा शिकवायला निघालेत, विनायक राऊतांचा केसरकारांना टोला

संजय राऊतांना राष्ट्रवादी वगळता इतर कुठलाही पक्ष घेणार नाही – दीपक केसरकर

Team Global News Marathi: