सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या अन चंद्रकांत पाटलांनाही लगावला टोला

 

नवी दिल्ली | खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारने उचललेल्या विविध पावलांबाबत सवाल उपस्थित केला आहे. जीएसटीबाबत त्या म्हणाल्या की, मविआ सरकारने आधीच पत्र दिलं होतं, GST बाबत निर्णय करू नका.
मात्र त्यांचं ऐकण्यात आलं नाही. नोट बंदी झाली, मी आर्थिक तज्ज्ञ नाही, पण ATM व्यवहार केल्यावर आपलेच
पैसे काढायला आम्हाला पैसे द्यावे लागतात. नवं डेबिट कार्ड, बँक स्टेटमेंट, चेक बूक यासाठी चार्जेस का घेतले जातात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आमच्याकडूनही चुका झाल्या असतील. पण काम करणाऱ्यांकडूनच चुका होतात. UPA च्या काळात सिलिंडर 300, 400 रुपये होता. पण आता १ हजार हा जादूचा आकडा बाजारात आहे. तसेच पोट हे आकड्यांनी भरत नाही ते धान्यांने भरतं. एका अध्यक्षांनी मला, मी महिला असल्याने घरी जायला सांगितलं होतं. भर संसदेत सुप्रिया सुळे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला. मात्र लोकसभा अध्यक्षांनी हे वक्तव्य रेकॉर्डवर न घेण्याची सूचना दिली.

दरम्यान महाराष्ट्रात संजय राऊतांना अटक केल्यानंतर पक्षात खळबळ उडाली आहे. पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी संजय राऊत यांना विशेष ईडी न्यायालयाने 4 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने केलेल्या तपासात प्रथमदर्शनी संजय राऊत यांचा सहभाग असल्याचं आढळून येत आहे, असं मत न्यायाधिशांनी मांडलं.

‘देशात हिटलरशाही सुरू’, जे पी नड्डांच्या विधानावरून उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

चार घरांची चव चाखून आलेले शिवसेनेला शहाणपणा शिकवायला निघालेत, विनायक राऊतांचा केसरकारांना टोला

Team Global News Marathi: