देशाच्या राजकारणातील मोठी बातमी, उद्धव ठाकरे भिडणार थेट नरेंद्र मोदींना?

 

आगामी 2024 च्या निवडणुकीमध्ये मोदींचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. अशाच शिवसेना पक्षाला महाराष्ट्रात भाजपने फोडून भगदाड पाडले आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीश कुमारांच्या लीगमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंना प्रमुख विरोधी नेता बनवण्याची योजना असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. भाजपच्या कार्यशैलीचा ‘बळी’ म्हणून येत्या काळात उद्धव ठाकरेंना दाखवण्याची योजना आखण्यात आल्याचं समजतंय. यामुळे उद्धव ठाकरे राष्ट्रीय स्तरावर प्रमुख विरोधी पक्षनेते म्हणून जागा घेण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे हे येत्या काळात शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि अखिलेश यादव यांच्या लीगमध्ये असतील अशी सूत्रांची माहिती आहे. दिल्लीकरांशी दोन हात करत असताना उद्धव यांना महाराष्ट्रातील लोकांची अभूतपूर्व सहानुभूती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.विशेष म्हणजे, भाजप आणि शिवसेना या दोन्ही हिंदुत्वावादी संघटना आहे. त्यातच उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहे.

Team Global News Marathi: