उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फडणवीसांना खास सल्ला देत केलं मोठं वक्तव्य

 

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या या नोटीसवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देत खास सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले, नोटीस देणं अशी परिस्थिती आपल्या देशात कधीच नव्हती. वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं असं नव्हतं. मी देशाच्या पंतप्रधानांच्यासमोर देखील त्याच्या संदर्भात थोडफार वक्तव्य केलं होतं.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, प्रत्येकाने आप-आपलं काम करावं. जनतेने ज्यांना पाठिंबा दिला आहे, लोकशाहीत जनता ज्यांच्या पाठिशी आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं असं माझं मत आहे. जबाबदार व्यक्तीने कसं काम केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं सर्वांना सोबत घेऊन गेलं पाहिजे हे सर्व स्तरावर जर झालं, लोकांना एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात काहीही रस नाहीये.

नागरिकांचे प्रश्न सुटावेत. पण हे प्रश्न राहतात बाजूला आणि कुणीतरी काही वक्तव्य करतं तर कुणी नोटीस पाठवतं. यामध्ये वेळ घालवू नका आणि विकासाला महत्त्व दिलं पाहिजे असंही अजित पवार म्हणाले. आज सकाळी चुशीसाठी देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनमध्ये हजार राहणार आहेत या संदर्भात अजित पवारांनी हे विधान केले होते.

Team Global News Marathi: