डिलिव्हरी बॉयला शिवसैनिकांकडून हाणामारी, पोलीस स्थानकात गुना दाखल

 

मुंबई | मुंबईत एका डिलिव्हरी बॉयनं शिवसैनिकांवर गंभीर आरोप केले असून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप डिलिव्हरी बॉयनं शिवसैनिकांवर केला आहे. दरम्यान, पीडित व्यक्तीच्या बहिणीचा आरोप आहे की पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याऐवजी तक्रारीच्या काही तासांनंतर एफआयआर दाखल केला आहे.

या प्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंबईतील समता नगर पोलीस क्षेत्रात ही घटना समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरात अॅमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयसोबत काही शिवसैनिकांनी मारहाण केली. मारहाणीत राहुल शर्मा नावाच्या डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात सहा टाके लागले आहेत. यानंतर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर शिवसेनेच्या शाखा प्रमुखांसह चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र आणखी दोन फरार आहेत.

Team Global News Marathi: