दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

 

नवी दिल्ली | आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. काही असामाजिक तत्त्वांनी केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला.

तसेच या हल्यातहल्ला करणाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेक्युरिटी बॅरिअर तोडले आहेत. तसेच घराच्या गेटवरील बूम बॅरिअरही तोडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर भाजपच्या गुंडांनीच हा हल्ला केल्याचा आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनीही या हल्ल्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, आपच्या या आरोपावर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजप यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.

Team Global News Marathi: