“बदनामीची मोहीम उद्या तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही”

 

मुंबई |मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर ईडीने मंगळवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्हारीया जनता पक्षवर व किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

राऊत म्हणाले की, ‘हे शेकडो, हजारो कोटी खर्च करून निवडणुका लढत आहात तो पैसा कुठून येतो? मोकळेपणाने श्वास घेण्याच्या स्वातंत्र्यावरचं हे संकट आहे. पण हे काही काळच राहणार. आज आमच्या विरोधात बदनामीची मोहीम आहे. हीच मोहीम उद्या त्यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही,’ असा इशारा राऊत यांनी दिला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, ईडीने दोनचार ठिकाणी काय कारवाया केल्या म्हणून महाराष्ट्रातील राजकारण तापत नाही. दिल्लीत ईडीचे हेड क्वॉर्टर आहे. पण पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजप विरोधी सरकार आल्याने ईडीचं हेड क्वॉर्टर महाराष्ट्र आणि बंगालमध्ये आले आहे. या ना त्या कारणाने विरोधकांना त्रास देण्यासाठी हे सर्व सुरू आहे. आम्ही पंतप्रधान कार्यालयात आणि ईडीकडे सर्व पुरावे दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयातून मला पोचपावती मिळाली आहे. मात्र, आमच्या पुराव्यांकडे कुणाचे लक्ष नाही. केवळ सिलेक्टेड कारवाई सुरू आहे.

Team Global News Marathi: