लोकांना पूर्वीप्रमाणे बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागत नाही, कारण आता सर्वत्र एटीएम मशीन आहेत. तुम्हाला फक्त डेबिट किंवा क्रेडिट कार्डची गरज असते ते असेल तर तुम्ही एटीएममध्ये जाऊन पैसे काढू शकता. इतकंच नाही तर याशिवाय घरी बसून काही वस्तू मागवायची असेल, घरबसल्या कुणाला पैसे पाठवायचे असतील किंवा कुणाकडून मागवायचे असतील तरीही ते सहजपणे मागवता येतात.
मात्र पण हे नाकारता येत नाही की आपण जेवढे तंत्रज्ञानात प्रगत असतो, तेवढाच फसवणूक होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळं जर तुमचं डेबिट-क्रेडिट कार्ड कधी चोरीला गेलं, तर तुम्ही त्वरित काही काम करणं महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. चला तर मग, डेबिड किंवा क्रेडिट कार्ड चोरीला गेल्यास काय करावं याबद्दल जाणून घेऊया.
कार्ड ब्लॉक करणं आवश्यक- जर तुमचं डेबिट-क्रेडिट कार्ड चोरीला गेलं असेल, तर तुम्ही सर्वप्रथम तुमचं कार्ड ब्लॉक करायला हवं. त्यामुळं तुमचं बँक खातं रिकामं होण्यापासून वाचू शकते. तुम्हाला तुमचं डेबिट/क्रेडिट कार्ड ब्लॉक करायचं असल्यास तुम्ही तुमच्या कस्टमर केअर किंवा कार्ड ब्लॉकिंग नंबरवर कॉल करू शकता. याशिवाय तुम्ही मोबाईल अॅपद्वारेही कार्ड ब्लॉक करू शकता.
तसेच फक्त फोन पे, गुगल पे नाही, व्हॉट्सअपवरूनही पाठवता येतात पैसे, असं अॅड करा बँक अकाउंट कृपया बँकेशी संपर्क साधा तुमच्या चोरीला गेलेलं कार्ड ब्लॉक करण्यापूर्वीच एखाद्यानं तुमच्या कार्डमधून पैसे काढले असतील, तर शक्य तितक्या लवकर तुमच्या बँकेला सूचित करणं महत्त्वाचं आहे. तुमची कार्डे चोरीला गेल्याची माहिती बँकेला देणं महत्त्वाचं आहे.
‘दुःख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य केला पण..’