छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाराव्या पिढीतल्या सूनबाई चंद्रलेखाराजे भोसले यांचे निधन:

नवी मुंबई (प्रतिनिधि/सातारा) :- छत्रपती शिवरायांच्या घराण्याच्या सुन व सातारचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांच्या पत्नी चंद्रलेखाराजे भोसले यांचे आज दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची चुलती (काकी) होत्या. सातारा शहरात वहिनीसाहेब म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाराव्या पिढीतील त्या सूनबाई होत्या.

कोरोना लसी संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे मोठे विधान..

काही महिन्यांपूर्वी त्या अदालत वाड्यातील आपल्या निवासस्थानी घसरून पडल्या होत्या. त्यांना अर्धांगवायूचाही त्रास झाला होता. पुणे येथील रुग्णालयात अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर सातारा येथील खासगी रुग्णालयातही उपचार करण्यात आले. उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पती शिवाजीराजे भोसले, मुलगी वृषालीराजे पवार (नाशिक), नातू कौस्तुभराजे पवार आणि जावई असा त्यांचा परिवार आहे. सातारा शहरातील अनेक संस्थांच्या त्या मार्गदर्शक होत्या. असंख्य व्यक्तींना त्यांनी पाठबळ दिले. त्यांच्या जाण्यामुळे शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या निधनाबद्दल कोल्हापूर गाडीचे छत्रपती संभाजीराजे यांनी ही दुःख व्यक्त केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: