दाऊदचा हस्तक एनआयएच्या ताब्यात; नवाब मलिक यांच्याशी संबंध?

 

मुंबई | राष्ट्रीय तपास संस्थेने दाऊदशी संबंधित असणाऱ्या २० ठिकाणांवर छापा घातला आहे. नागपाडा, मुंब्रा, भेंडीबाजार, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूज अशा अनेक ठिकाणी सकाळपासूनच एनआयएच्या टीमकडून धाडसत्र सुरु आहे. हे सर्व छापे दाऊदसोबत संबंध असणाऱ्यांच्या ठिकाणी होत आहे. ही सर्व ठिकाणं दाऊचे शार्प शूटर, तस्कर, डी कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्यासोबत निगडीत आहेत.

एनआयए’ची ही कारवाई पाहाता दाऊदचं संपूर्ण नेटवर्क उद्धवस्त करण्याची पावलं उचलण्यात आली आहेत असं दिसून येतंय. फेब्रुवारी महिन्यापासूनच या अशा स्वरुपांच्या कारवायांना सुरुवात झाली होती. या छापेमारी दरम्यान सलीम फ्रूटला देखील ताब्यात घेण्यात आलंय. सलीम फ्रूट हा दाऊद इब्राहिमचा साथीदार आहे. त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे.

तसेच त्याच्याकडून काही महत्त्वपूर्ण दस्ताऐवज ताब्यात घेण्यात आले आहे. तसंच याप्रकरणात राष्ट्रवादीचे नेता नवाब मलिक यांचे संबंध असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यानंतर एनआयएकडून ही कारवाई करण्यात आलीय 1993 बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम आहे. भारतातून पळून गेलेला हा डॉन शेजारील राष्ट्रात राहून भारताविरोधात कारवाई करत असल्याचं अनेक प्रकरणात दिसून आलं आहे.

Team Global News Marathi: