“बापाच्या नावाने थापा अन् सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट” – भाजपा

 

मुंबई | शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटाचा दसरा मेळावा दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले.

मात्र, यातच एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणावरून महाविकास आघाडीतून टीका होऊ लागली आहे. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेवर पलटवार करण्यात येत आहे. सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट आणि बापाच्या नावाने थापा, या शब्दांत भाजपकडून प्रतुत्तर देण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून शिवसैनिकांना संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, अमित शाहांवर पुन्हा तोफ डागली. पाकिस्तानमधील माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार का, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली.

तसेच अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत, सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट… बापाच्या नावाने थापा. अरे हाच खरा थापा आहे… पण त्या आधी वाफा आहे.. कोण बोलतेय, उद्धव ठाकरे की राहुल गांधी? तीच बिनडोक भाषा…, असा खोचक टोला लगावला.

तसेच दसरा मेळाव्यात बोलताना, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना सोबत घेऊन हिंदुत्व व्यापक केले, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते, यावर शिल्लक सेनेच्या सरबरीत हिंदुत्वाचे गुपित अखेर उघड झाल्याचे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

Team Global News Marathi: