रोज गोमूत्र पिल्याने कॅन्सर आणि कोरोना सारखे रोग होत नाही, भाजपा आमदाराचा दावा !

सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजवायला सुरवात केली आहे. त्यात मोठया संख्याने रुगसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. आज वाढत असलेली ररुग्णसंख्या केंद्राच्या चिंतेत अधिक भर घालताना दिसत आहे. त्यातच देशात चिंतेतेचे वातावरण पसरलेले असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते वादग्रस्त विधान करून स्वतःचे आणि पक्षाचे नुकसान करताना दिसत आहे.

भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. रोज गोमूत्र प्यायल्यास कोरोना होणार नाही असं वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. भाजपाचे बुलंदशहचे आमदार देवेंद्र सिंह लोधी यांनी गोमूत्र प्यायल्याने कॅन्सर आणि कोरोनासारखे आजार होणार नाहीत असा दावा केला आहे. गोमूत्र प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं देखील म्हटलं आहे. देवेंद्र सिंह लोधी यांनी रोज 25 एमएल गोमूत्र प्यायल्याने सर्व आजार पळून जातात असं म्हटलं आहे.

तसेच लिव्हर, किडनी यांनाही खराब होऊ देत नाही असं म्हटलं आहे. लोधी यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. उत्तराखंडचे भाजपा आमदार महेंद्र भट्ट यांनीदेखील उपाशी पोटी गोमूत्रचं सेवन केल्यास कोरोनाचा खात्मा होईल असा दावा केला होता. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. तसेच अनेकांनी यावर सडकून टीका केली आहे.

देवेंद्र सिंह यांच्या या वादग्रस्त विधानावर राजीव शुक्ला यांनी जोरदार टीका केली आहे. “हे सर्व अद्यापही सुरू आहे. कोर्टाने यांना शांत राहण्यास सांगितलं पाहिजे. अशा विधानांमुळे लोकांमधील रोष वाढतो. भाजपा आमदारांना अशा विधानांची आता सवय झाली आहे. कोणीही गोमूत्रच्या विरोधात नाही. पण डॉक्ट असल्याप्रमाणे कोरोनावरील इलाज सांगून गोमातेला यामध्ये आणू नये” असे म्हटले आहे.

Team Global News Marathi: