मला जीवे मारण्याचा कट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या संगनमतीने – किरीट सोमय्या

 

नवी दिल्ली | पुणे महापालिका कार्यालयात भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्का बुक्की करण्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर आज सोमय्या यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी संगनमत करुन जीव घेण्याचा कट रचला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत आणि त्यांच्या कंपनीला उद्धव ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात कंत्राटे दिली. त्याचा घोटाळा मी वारंवार बाहेर काडू लागलो त्यामुळेच माझ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला असा आरोपच पत्रकार माध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी ;लगावला होता.

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मदतीने संगनमत करून हा कट रचला आहे.उद्धव ठाकरे सरकारनेच संजय राऊत यांच्या बेनामी कंपन्यांना कंत्राट दिले आहे. कोविड घोटाळे पीएमआरडीएने पुणे महापालिकेने नाकरलेल्या लोकांना कंत्राट दिली गेली, असल्याची माहिती यावेळी मनोज कोटक यांनी दिली.

Team Global News Marathi: