आयुक्तांवर करण्यात आलेल्या शाईफेकीच्या निषेधात मनपा कर्मचाऱ्यांचे सोमवार पर्यंत काम बंद आंदोलन

 

अमरावती | छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्या नंतर त्याचा राग मनात धरून अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकली होती. त्यामुळे, मनपा आयुक्त आष्टीकर यांच्या समर्थनार्थ महापालिका कर्मचाऱ्यांनी काल पासून पालिकेत काम बंद आंदोलन सुरू केले आहे,

यावेळी कर्मचाऱ्यांनी आमदार रवी राणा यांच्या सह कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी आंदोलन कर्त्यां कर्मचाऱ्यांनी केली आहे. सोमवार पर्यंत हे काम बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली, यावेळी शाईफेकीचा तीव्र निषेध कर्मचाऱ्यांचे वतीने करण्यात येत असून आज मनपा समोर सर्व कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्या आहे.

अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांनी अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्याने तो पुतळा मनपा प्रशासनाने हटवला होता. तर, १९ फेब्रुवारीपूर्वी शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवा, अशी मागणी आमदार रवी राणा यांची आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेकून आपला निषेध नोंदवला आहे. या घटनेनंतर कर्मचारी वर्गाने संताप व्यक्त केला होता.

Team Global News Marathi: