नारायण राणे यांच्या टिकेनंतर पुराव्यासकट संजय राऊत यांनी केली बोलती बंद !

 

मुंबई | दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीवरून भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तो अपक्ष उमेदवार असल्याचा वक्तव्य केलं होतं. तसेच त्यांनी जोरदार टीका केली होती. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रत दाखवत राणेंना सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.

शुक्रवारी सकाळी सकाळी नारायण राणे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी ट्वीट करून जशाच तसे उत्तर दिले आहे. जे सांगतात दादरा नगर हवेली च्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन देलकर शिवसेनेच्या नाहीत.. त्यांचा हा जळफळाट आहे. जरा ही भारत निर्वाचन आयोगाची website पहा’ असं म्हणत संजय राऊत यांनी नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले.

तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला. नारायण राणे यांनी शिवसेनेशी गद्दारी करून काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याशी गद्दारी करून ते भाजपमध्ये गेलेत. उद्या ते भाजपशीही बेईमानी करून दुसऱ्या पक्षात जातील, आजपर्यंत नारायण राणे यांनी आपल्या उपकारकर्त्याच्या पाठीत खंजीर खुपसून जेवढी गद्दारी केली तेवढी कुणी केली नसेल. त्यामुळे राणेंना शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत विनायक राऊत यांनी राणेंना फटकारून काढलं.

Team Global News Marathi: