महाराष्ट्रावर अंधाराचे संकट आणि मामूचे इटली प्रेम !;

 

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विविध मुद्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरतात दिसून आली आहे. त्यातच राज्यावर आलेल्या अंधाराच्या संकटावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

‘स्वाभिमान विकून वसुलीसाठी चालली आघाडीची सेंटीग .राज्यात केला अंधार आता मागवलीय इटलीची लायटिंग.मामुचं_इटलीप्रेम,’ असे ट्विट करून देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये दोन व्यक्ती बोलताना दाखविले असून शिवाजी प्रकट इटलीवरून लाइट्स आणल्या असे बोलताना दाखविले आहे तर दुसरी व्यक्ती आता काय काय मामूचे इटली प्रेम असे बोलताना दाखविले आहे.

मुंबई येथील शिवाजी पार्क परिसरात विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आल्यानंतर महापालिकेने प्रसिद्धी पत्रक काढून माहितीही दिली आहे. त्यानुसार दिव्यांसाठी सव्वा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यात पाच वर्षांचा देखभाल खर्च समाविष्ट आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Team Global News Marathi: