राणे बंधूंविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

राणे बंधूंविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

मुंबई : हिंदुत्वाची बाजू घेणे हा गुन्हा असेल तर हा गुन्हा शंभरवेळा करेन. मी दंगल कुठे भडकवली, हिंदू म्हणून भूमिका मांडली. राज्य सरकार नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही. एवढाच त्यांना दाऊदचा पुळका असेल तर त्यांनी महात्मा गांधींच्या फोटोंऐवजी दाऊदचे फोटो भिंतीवर लावावेत, असा टोला आ. नितेश राणे यांनी राज्य सरकारला लगावला.

निलेश राणे यांनीही नवाब मलिक यांच्यासंदर्भात शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा संशय येत असल्याचे विधान केले होते. त्यावरून मरीन ड्राईव्ह पोलिसांनी राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: