शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंसह ८० धारकऱ्यांवर गुन्हा दाखल |

 

कऱ्हाड | सतत वादग्रस्त विधाने करत नेहमी चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोरोनाच्या संसर्गात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करीत जमाव जमवून कोरोनाच्या निर्देश व आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीसंभाजीराव भिडे यांच्यासह सुमारे ८० धारकऱ्यांवर कऱ्हाड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याने याबाबतची फिर्याद दिली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे, सागर आमले, अजय पावस्कर, केदार डोईफोडे, प्रवीण माने, गणेश कापसे, रणजित पाटील, सुदर्शन पाटसकर यांच्यासह अन्य धारकऱ्यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आषाढी वारीवर राज्य शासनाने निर्बंध घातले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर पायी दिंडी सोहळा काढण्यास मनाई करण्यात आली असून वारीला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंडातात्या कऱ्हाडकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

बंडातात्या कऱ्हाडकर यांच्यासह वारकऱ्यांना वारीसाठी परवानगी द्यावी, या मागणीला समर्थन देत सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे कराड येथील दत्त चौकात जमले होते. त्यावेळी त्यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या ७० ते ८० धारकऱ्यांनी बंद असलेले साईबाबा मंदीर उघडून आत बसले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे.

Team Global News Marathi: