कलादिग्दर्शक राजू सापते आत्महत्या, लेबर युनियनच्या गुंडगिरीला भाजपचे राम कदम जबाबदार |

 

मुंबई | फिल्म स्टुडिओज सेटिंग अँड अलाईड मजदूर युनियन या कामगार युनियनच्या त्रासाला कंटाळून मराठी कलादिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली आहे. युनियनमधील या वाढत्या गुंडगिरीला भाजपचे आमदार राम कदम जबाबदार आहेत. तसेच भाजपाकडे गृहमंत्री पद असल्यामुळे वारंवार तक्रार करूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. याप्रकरणी राम कदम यांच्यावरदेखील कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

फिल्म स्टुडिओज सेटिंग अॅण्ड अलाईड मजदूर युनियनमध्ये कशा प्रकारे नियमबाह्य पद्धतीने काम चालते याबाबत खासदार कीर्तिकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी भाजपशी निगडित फ्लिम युनियन्व्हर गंभीर आरोप लावले होते,

फिल्म स्टुडिओज सेटिंग अँड अलाईड मजदूर युनियन या संघटनेवर आता कोणताही संबंध नसलेल्या चांडाळ चौकडीने कब्जा केला आहे. या संघटनेचे अनधिकृत पदाधिकारी असलेले गांगेश्वरलाल श्रीवास्तव, राकेश मौर्या, अशोक दुबे, बी.एन. तिवारी हे कामगारांचे संरक्षण करण्याऐवजी उलट निर्माते, कलादिग्दर्शक, स्टुडिओतील कंत्राटी कामगारांना धमकावतात.

तसेच युनियनच्या कुठल्याही कायद्याचे कुठलेही पालन करत नाहीत. याविरोधात वर्षभरापासून कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्याकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. स्टुडिओमध्ये या कंपूची दादागिरी चालते. त्याविरोधात पोलीस उपायुक्त झोन १२, आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नूतन पवार, फिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा आणि फिल्म सिटीचे सुरक्षा अधिकारी अशोक जाधव यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खासदार कीर्तिकर यांनी केला आहे.

Team Global News Marathi: