“देश दोन हिंदूमध्ये विभागला गेलाय; एक मंदिरांमध्ये प्रवेश करु शकतो, दुसरा नाही”

 

नवी दिल्ली | अभिनेत्री कंगना रणौतपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापर्यंत अनेकांची विधाने गाजताना दिसत आहेत. यातच आता लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांच्या विधानाची भर पडली आहे. देश दोन हिंदूमध्ये विभागला गेला आहे. एक मंदिरांमध्ये प्रवेश करु शकतो, दुसरा नाही, असे मीरा कुमार यांनी म्हटले आहे.

माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांच्या “द लाइट ऑफ एशिया:द पोएम दैट डिफाइंड बुद्धा” या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी आयोजित कार्यक्रमात मीरा कुमार बोलत होत्या. अनेकांनी माझ्या वडिलांना जातीय भेदभावामुळे हिंदू धर्म सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र, माझे वडील जगजीवन राम यांनी हिंदू धर्म सोडण्यास सपशेल नकार दिला होता. तसेच या चुकीच्या सामाजिक व्यवस्थेविरोधात लढा देण्याचा निर्धार त्यांनी केला, अशी आठवण मीरा कुमार यांनी यावेळी बोलताना सांगितली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आजही २१ व्या शतकात जाती व्यवस्था कायम असल्याचे दिसून येते. आपला भारत देश दोन प्रकारच्या हिंदू समुदायांमध्ये विभागला गेला आहे. एक म्हणजे जो मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेऊ शकतो आणि दुसरा असा हिंदू समाज आहे, ज्याला अजूनही मंदिरांमध्ये प्रवेश नाकारला जातो, असे मीरा कुमार यांनी म्हटले आहे. तसेच धर्म बदला असा सल्ला देणाऱ्यांना वडील जगजीवन राम नेहमी विचारत असत की, धर्म बदलला म्हणून जात बदलणार आहे का, असेही मीरा कुमार यांनी सांगितले.

Team Global News Marathi: